नागपूर: ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याने अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला समोर जावे लागत आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली. विविध समस्यांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य त्रस्त असताना प्रशासन सुस्त असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर काँग्रेसने गुरुवारी महापालिकेवर धडक मोर्चा नेला.
यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवणे आमचे काम आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या एजी एन्व्हॉयरो व बीव्हीजीच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा नाही. विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागलेले असतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर पालिकेने या भीषण समस्येकडे लक्ष दिले नाही तर काँग्रेसच्या वतीने शहरातील कचरा उचलून महापालिकेत टाकण्यात येईल, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला. तसेच पक्षाच्या वतीने अनियमित पाणीपुरवठा व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
दरम्यान काँगेसच्या शिष्टमंडळात पक्षाचे सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार,संजय महाकाळकर, दिनेश बानाबाकोडे, पुरुषोत्तम हजारे, नरेश गावंडे, रमण पैगवार, गुड्डू तिवारी, रमेश पुणेकर, नितीन साठवने, मनोज साबळे, भावना लोणारे, गजराज हटेवार, वसीम खान, स्नेहा निकोसे, विवेक निकोसे, मिलिंद दुपारे आदींचा समावेश होता.
आंदोलनात संजय सरायकर, महेश श्रीवास, अभय रणदिवे, मनोहर तांबुलकर, ज्ञानेश्वर ठाकरे, रवी गाडगे, दिनेश तराळे, प्रवीण गवरे, पंकज निघोट, मोतीराम मोहाडीकर, अब्दुल शकील, इर्शाद मलिक, देवेंद्र रोटेले, सूरज आवळे, रजत देशमुख, विश्वेश्वर अहिरकर, गोपाल पट्टम, राजेश कुंभलकर, अरुण डवरे, दीपक वानखेडे, आशिष दीक्षित आदी सहभागी झाले होते.