Advertisement
नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे महायुतीविरोधात आज नागपुरात ‘जोडो मारो आंदोलन’ करण्यात आले.
महाल येथील गांधी गेटसमोर नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्षआणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे नेते विशाल मुत्तेमवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधातआक्रमक पवित्रा घेतला तसेच यावेळी जोरदार नारेबाजीने परिसर दणाणून सोडला.
अगदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोवर जोडे मारले.