Published On : Fri, Apr 10th, 2020

नागपुरात मिळाले कोरोनाचे आणखी 6 पॉझिटिव्ह रुग्ण. एकूण संख्या झाली 25

Advertisement

नागपूर : नागपुरात कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सहा सदस्यांची गुरुवारी पॉसिटीव्ह चाचणी झाली आणि शहरात कोरोना रुग्णांची संख्या 25 झाली. सर्व पॉसिटीव्ह रूग्णांचे वयः 8, 12, 21, 30, 34 आणि 35 आहे. ६ एप्रिलला कोव्हीड -१९ मुळे शहराचा पहिला मृत्यू झाला. पूर्व नागपुरातील एका 68 वर्षीय वृद्धाची रविवारी रात्री निधन झाल्यानंतर सोमवारी तो रुग्ण कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्या रुग्णाला 4 एप्रिल रोजी श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे शहरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

शिवाय, मृताचा प्रवासाचा इतिहास नव्हता. मनपाच्या अधिकाऱ्यांनी तो राहत असलेल्या परिसर सील केला आहे. गुरुवारी रात्री 6 पॉसिटीव्ह केस अचानक आल्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी विदर्भात एकूण 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात अकोल्याची 11, नागपूरची 6 आणि बुलढाणाची 5 प्रकरणे आहेत.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement