Published On : Fri, Jun 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात फर्जी पत्रकारांचा आतंक;बिल्डरला मागितली पाच लाख रुपयांची खंडणी; तिघांना अटक

Advertisement

नागपूर : बदनामीची भीती दाखवून नागरिकांना लुटण्याचा प्रकार फर्जी पत्रकरांकडून शहरात सर्रासपणे सुरु आहे.नुकतेच शहरातील एका बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पोलिसांनी अटक केली.उपायुक्त निकेतन कदम यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना रंगेहाथ पकडले. कामठी कळमना मार्गावरील मरारटोली परिसरात गुरुवारी (दि. ६) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

वीरकुमार दिनसिंह (३०, रा. संताजीनगर, कन्हान, ता. पारशिवनी), शेख हबीब शेख रहमतुल्ला (३४, रा. पटेलनगर, कन्हान, ता. पारशिवनी) व सय्यद रिजवान हैदर सय्यद अस्वर अली रिजवी (५०, रा. सैलाबनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन गोपाल गुप्ता (४५, रा. जीपीओ चौक, सिव्हिल लाइन, नागपूर) हे केसर लँड बिल्डर्स नामक फर्मचे मालक आहेत. तर वीरकुमारसह अन्य दोघे न्यू आवाज न्यूज या यू-ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी आहेत.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, फर्जी पत्रकार वीरकुमारसह तीन जणांनी पांदण रस्त्यावर ले-आउट टाकून भूखंड विकल्याचा आरोप करीत सचिन गुप्ताला १० लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सचिन यांनी १७ मे रोजी तिघांच्या विरोधात कामठी (नवीन)
ठाणे व पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली होती. पैसे मागणीचा तगादा वाढल्याने पोलिसांनी तीन दिवसांपासून सापळा रचला होता. तिघेही गुरुवारी दुपारी मरारटोली भागात आले. त्यांनी सचिन गुप्ता यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३८४, ३८६, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

वीरकुमारने यापूर्वी अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याच्या विरोधात कन्हान पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली. त्याच्याकडून ब्लॅकमेलिंगच्या इतर घटना उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement