Published On : Tue, Aug 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर सायबर पोलिसांची कारवाई: बनावट ईमेलद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

Advertisement

nagpur cyber crime

नागपूर शहरातील सायबर पोलिसांनी बनावट ईमेल आयडीचा वापर करून राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतून अटक केली आहे. आरोपींनी नागपूर सायबर पोलिस असल्याचे भासवून विविध बँकांना फसवणूक करणारे ईमेल पाठवले होते.

या प्रकरणात स्वेता कुमार त्रिलोचन पाणीग्राही (वय 36), असिस्टंट बँक मॅनेजर, आयसीआयसीआय बँक, नागपूर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, पाणीग्राही यांना त्यांच्या बँक खात्याच्या फ्रिज आणि डीफ्रिज करण्याबाबत सायबर पोलिस असल्याचे सांगणारे बनावट ईमेल प्राप्त झाले होते. ईमेलची पडताळणी केल्यानंतर तो बनावट असल्याचे उघड झाले.

Gold Rate
Monday 20 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 91,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान, सायबर पोलिसांनी बनावट ईमेल आयडीचा तांत्रिक तपास करून मुंबईतील दोन आरोपींची ओळख पटवली:

1. प्रदुम अनिल सिंह, रा. आझाद चाळ, मालाड ईस्ट, मुंबई.
2. शुभम पितांबर साहू, रा. मुलुंड वेस्ट, मुंबई.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिस पथक मुंबईत रवाना झाले आणि आरोपींना अटक करून नागपूर सायबर पोलिस ठाण्यात आणले. आरोपींनी नागपूर सायबर पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली होती. ते बनावट ईमेल आयडीचा वापर करून बँक खात्यांचे फ्रिज आणि अनफ्रिज करण्याची मागणी करत होते.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त निमीत गोयल, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित डोळस आणि त्यांच्या टीमने केला. आरोपींना 14 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement