– अध्यक्ष पदी प्रा, डॉ, सुधीर अग्रवाल
महासचिव पदी प्रा,रविकांत जोशी गडचांदूर
कामठी :-विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र या विषयाची सखोल माहिती मिळवता यावी,त्यांना राज्यशास्त्राची आवड निर्माण व्हावी एवढेच नव्हे तर राज्यशास्त्राचा बदललेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सोप्यात- सोप्या भाषेत समजावून सांगून विद्यार्थ्यांना गतीमान करण्यासाठी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यलयीन परिषद ची नागपूर विभागीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. परिषदेच्या विभागीय अध्यक्ष पदी प्रा,डॉ सुधीर अग्रवाल(नागपूर) तर विभागीय महासचिव पदी प्रा रविकांत जोशी(वरोरा) यांची एकमताने निवड करण्यात आली.
समकालीन राजकीय घटनांचा अभ्यास करून ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे या माध्यमातून सुलभ होणार आहे.राज्य पातळी पासून तर जिल्हा पातळीवर अशा समित्या स्थापन केल्या असून परिषदेचे अधिवेशन भरवून गती देण्यासाठी कार्यक्रम आखले जाणार आहे. नागपूर ,कोल्हापूर ,मुंबई ,पूणे,नाशीक,कोकण,लातुर विभागीय राज्यशास्त्र कनिष्ठ .महाविद्यालयीन परिषदा स्थापन केल्या आहे.
अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य शरद जोगी यांनी दिली,नवनियुक्त विभागीय कार्यकारिणी चे अभिनंदन राज्य अध्यक्ष प्रा,सुमित पवार,उपाध्यक्ष प्राचार्य शरद जोगी,सचिव प्रा,डॉ,पितांबर उरकुडे यांनी केले आहेत,
संदीप कांबळे कामठी