नागपूर: प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधात केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत, गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पारडी परिसरातून 13 लाख रुपये किमतीचा 87.1 किलो गांज्याची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. शेख शाहरुख शेख खलील (वय 35) आणि गौरव राऊत (वय 22, दोघेही रा. पारडी) अशी आरोपींची नावे आहे . दोन्ही आरोपींनी हा गांजा औषधे आणि सलाईनच्या साठ्यात लपवून ठेवला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला पारडी भागातून शहरात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे तडकाफडकी कारवाई करत पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना पारडी परिसरातील मानकरवाडी मैदानात ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 26.36 लाख रुपये किमतीचा गांजा, ट्रक आणि औषधेही जप्त केली.
डीसीपी (डिटेक्शन) मुम्माका सुदर्शन आणि एसीपी अशोक कोळी यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
पीआय सरीन दुर्गे यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि पीएसआय मनोज राऊत, तसेच पोलीस कॉन्स्टेबल विजय यादव आदींनी आरोपींना अटक केली.