Advertisement
नागपूर: आज सकाळी उपराजधानी नागपूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर आले. सकाळी ७:२९ वाजता भूकंपाचे हे धक्के बसले.
बेसा आणि मनीष नगरसह दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये या धक्क्यांचा अधिक प्रभाव जाणवला. भूकंपाची तीव्रता अद्याप समोर आलेली नाही. सध्या कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून तपास सुरू आहे.