नागपूर : केंद्रीय नितीन गडकरी यांचा सहज विजय झाला असला तरी उत्तर नागपूर आणि मध्य नागपूरमध्ये ते पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिले. त्यांना या दोन्ही विधानसभा मतदारसंघात एखाददुसरी फेरी सोडली तर काँग्रेस नाना पटोले यांना कांकणभर अधिकच मते मिळाल्याचे दिसून येते.
उत्तर आंबेडकरी विचारांचे तर मध्य नागपूर मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले होते. मात्र, या दोन्ही मतदार संघात गडकरी यांना तुलनेने कमी मतदान झाले.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पटोलेंपेक्षा गडकरी यांना १५ हजार ४१९ मतांची आघाडी होती. मात्र, उत्तर नागपूरमध्ये पहिल्या फेरीत गडकरी यांना पाच हजार २२९ आणि नाना पटोले यांना पाच हजार ३५७ मते होती. मध्य नागपूरमध्ये गडकरी यांना पाच हजार ४६५ आणि पटोले यांना पाच हजार ३५७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत गडकरी यांना ३३ हजार २९७ मतांची आघाडी होती. मात्र, उत्तर नागपुरात ३८० आणि पटोले यांना ६०७१ मते होती. तिसऱ्या फेरीत देखील गडकरी यांची आघाडी वाढली. मात्र, उत्तर नागपुरात गडकरी यांना चार हजार २८३ मते आणि पटोले यांना पाच हजार ६३ मते मिळाली.
चौथ्या फेरीत देखील परिस्थिती बदलली नाही. गडकरी यांना उत्तर नागपुरात पटोलेंपेक्षा कमी मते मिळाली. या फेरीत गडकरी यांना तीन हजार ५५० आणि पटोले यांना पाच हजार ११४ मते पडली. सहाव्या फेरीत गडकरी यांना दोन हजार ५४२ आणि पटोले यांना पाच हजार ९२२ मते मिळाली.
मध्य नागपुरात सुरुवातीत थोडा फरक पडला आणि नंतर कधी गडकरी तर कधी पटोले यांच्या पारडे खाली-वर होत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या फेरीत गडकरी यांना चांगले मताधिक्य मिळाले. या फेरीत त्यांना आठ हजार ६३८ आणि पटोले यांना दोन हजार ८६७ मते मिळाली. चौथ्या फेरीत मात्र गडकरी यांना कमी मते मिळाली. गडकरी यांना पाच हजार ७८४ आणि पटोले यांना सहा हजार ३१२ मते मिळाली. गडकरी यांना पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपुरातून सातत्याने मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. अशाप्रकारे दोन मतदारसंघ मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही गडकरी यांच्यासाठी सरस ठरले.
* उत्तर नागपूर-पहिली फेरी
पटोले – ५,३५७
गडकरी – ५,२२१
* मध्य नागपूर – पहिली फेरी
पटोले – ६,६८८
गडकरी – ५, ४६५
* उत्तर नागपूर – दुसरी फेरी
पटोले – ६,०७१
गडकरी – ३८०
* मध्य नागपूर – दुसरी फेरी
पटोले – २,८६७
गडकरी – ८,६३८
* उत्तर नागपूर – तिसरी फेरी
पटोले – ५,०६३
गडकरी – ४,२८३
* मध्य नागपूर – तिसरी फेरी
पटोले – २,५८१
गडकरी – ७,८३६
* उत्तर नागपूर – चौथी फेरी
पटोले – ५,११४
गडकरी – ३,५५०
* मध्य नागपूर – चौथी फेरी
पटोले – ६,३१२
गडकरी – ५,७८४