Published On : Mon, Jun 26th, 2017

गुलमर्गमध्ये रोप वे तुटून नागपुरचं कुटूंब मृत्युमुखी


श्रीनगर :
गुलमर्गमध्ये रोप वे केबल तुटून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही दुर्घटना घडलीय. मृतांमध्ये चार पर्यटकांचा समावेश असून ते दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी अनाघा आणि जान्हवी अशी त्यांची नावं आहेत. अंद्रासकर कुटुंबीय हे मूळचे नागपूरचे राहणारे आहेत.

मानेवाड़ा रोडवरील चक्रधरनगरमध्ये ते राहत होते. दोन वर्षांपूर्वी जयंत नोकरीनिमित्त दिल्लीला राहायला गेले. सोमवारी दुपारपर्यंत त्यांचे मृतदेह नागपूरला आणण्यात येतील. त्यांचा गाइड मुख्यात अहमद गनीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर मृतांची ओळख अद्याप पटवण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय.

Advertisement

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above