Advertisement
नागपूर : जिल्ह्यात मध्यरात्री पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. एकीकडे वाढती थंडी आणि दुसरीकडे पाऊस यामुळे पाऱ्यात सहा अंशांची घट झाली. मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मात्र सकाळी पावसाचा जोर वाढला.
या पावसामुळे जनजीवन वस्कळित झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी गारादेखील पडल्या असून शहरातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे.
नागपुरात हिल स्टेशनचा अनुभव –
नागपूरकरांनी आज हिल स्टेशनचा अनुभव घेतला. आज सकाळपासूनच सूर्यनारायणचे दर्शन झाले नाही. विदर्भात आणखी एक-दोन दिवस पाऊस व ढगाळ वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. या अवकाळी पावसामुळे रब्बी पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.शहरात पावसामुळे बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता.