Advertisement
नागपूर: सलूनच्या आडून वेश्याव्यवसाय करवून घेणा-या मोहम्मद शमिम अब्दुल करिम (वय ५१, रा. जाफरनगर, गिट्टीखदान) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.गिरीपेठमधील जगत मिलेनिअम अपार्टमेंटमध्ये शमिम हेअर ब्युटी प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली कुंटनखाना चालवित होता.
त्याच्याकडे येणारे ग्राहक बहुतांश धनिक होते. त्यामुळे त्याचा गोरखधंदा जोरात होता. पोलिसांना त्याची कुणकुण लागताच त्याच्याकडे मंगळवारी दुपारी एक पंटर पाठविण्यात आला. अडीच हजारात एक युवती ग्राहकाच्या हवाली केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुंटनखान्यावर छापा मारला.
पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील सहका-यांनी ही कामगिरी बजावली.