54 रक्तदात्याने केले रक्तदान
सावनेर (नागपुर)। दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा स्वर्गीय डॉ.निशिकांत रहाटे, व स्वर्गोय डॉ.मोहन बसवार यांचा स्मृतिप्रित्यार्थ डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून सावनेर इन्डियन मेडिकल असोशिएशन व ग्रामीण रुग्णालय सावनेर यांचा सयुक्त विद्यमाने दिनांक 5 जुलैला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शासकीय रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 18 ते 50 वयोगटातील 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या आधी डॉक्टर्स दिनानिमित्य इयत्ता 10 वी व 12 वी च्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता 10 वी मध्ये जवाहरलाल नेहरू शाळेतिल साक्षी सुभाष काळे व दुर्गेश पांढुरकार यांनी 94.60 टक्के तर सारस्वत कॉलेज मधील अश्विन सिद्धार्थ तागडे याने इयत्ता 12 विला 89.37 टक्के गुण मिळविल्याने यानिमित्य त्यांचा सर्व डॉक्टरांचा वतीने त्यांना एक हजार एक रूपये रोख पुरस्कार पुष्पगुच्छ शाला व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.मंचाकावर कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ.ज्योत्सना धोटे, डॉ विजय धोटे, डॉ रवी ढवळे, डॉ.भव्या परिहार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशास्वितेसाठी डॉ निलेश कुंभारे, डॉ.रवी ढवळे, डॉ प्रवीन वाकोड़े, डॉ संदीप गुजर, डॉ.देशमुख, डॉ.पोटोडे, डॉ.जैस्वाल, डॉ.भगत, डॉ.मानकर, डॉ.गौरी मानकर, डॉ.विलास मानकर, डॉ. जैन मैडम, हेल्थ यूनिटचे कर्मचारी व इतर डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रेणुका चांडक तर आभार प्रदर्शन डॉ.प्राची भगत यांनी केले.