Advertisement
राज्य सरकारने पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर केली असून, विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून, मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालेले नाही.
पालकमंत्रिपदाच्या यादीत काही नावे वगळण्यात आल्याने तसेच काही नवीन नियुक्त्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.