नागपूर: अविनाश आदमने (बदललेले नाव), रा. ओंकार नगर यांनी तक्रार नोंदविली कि, त्यांच्या नळाला पूर्ण दाबाने मिळणारे पाणी दर उन्हाळ्यात अचानक कमी दाबाने येते. या अचानक होणाऱ्या बदलाने ते गोंधळलेले होते. आणि हे का? व कसे? होते याबाबत जाणून घेण्यास इच्छुक होते.
मात्र, या समस्येचे निराकरण करताना आदमने यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा OCWच्या झोनल टीमने आदमने यांच्या शेजाऱ्यांकडे बेकायदेशीरपणे लावलेला टुल्लू (बूस्टर) पंप हस्तगत केला ज्यामुळे ते अतिरिक्त पाणी ओढून घेत होते आणि आदमने यांच्याकडे कृत्रिम पाणीसमस्या निर्माण झाली होती.
अशाचप्रकारे, एक जागरूक नागरिक दिनेश एम. (बदललेले नाव) यांनी OW कॉल सेंटरला फोन करून सिंधी कॉलोनी येथील त्यांच्या घरी कमी दाबाची समस्या असल्याचे सांगितले. OCWची चमू ज्यावेळी त्यांच्या परिसरात पोचली व शोध घेतला तेव्हा येथेही कमी दाबाच्या समस्येचे कारण तेच आढळले: टुल्लू पंप (बूस्टर)चा गल्लोगल्ली होणारा वापर.यामुळे या संपूर्ण परिसरात पाण्याची कृत्रिम समस्या निर्माण झालेली होती.
नागपुरातील उन्हाचा पारा ४५ डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. अशावेळी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते. अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत असतात. हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते.
यावर्षी, मनपा-OCWने बूस्टर पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तसेच नळजोडणी स्थगितीची कारवाई करण्याचे ठरवले आहे.
यासाठी, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी शहरभरात “टुल्लु पंप जप्ती मोहीम” सुरु केली आहे.
OCWनागरिकांमध्ये टुल्लु पंपाचा वापर न करण्याविषयी जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. कारण अशा वापरामुळे संपूर्ण परिसरात कमी दाबाची समस्या निर्माण होऊन सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.
मनपा-OCW ने गेल्या काही दिवसांत १०५हून अधिक पंप जप्त केले आहेत. पैकी १७ पंप लक्ष्मी नगर झोनमधून, ६ धरमपेठ झोन, २ हनुमान नगर झोन, २६ धंतोली झोन, १० नेहरूनगर झोन, १ गांधीबाग झोन, ७ सतरंजीपुरा झोन, २२ लकडगंज झोन, १३ आशी नगर झोन तर ९ मंगळवारी झोन येथून जप्त करण्यात आले (एकूण १०५).
येथे उल्लेखनीय आहे कि, मनपाच्या पाणीपट्टी उपविधीनुसार ‘मुख्य जलवाहिनीला बुस्टरपंप अथवा तत्सम उपकरण लावून पाणी घेतल्यास कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अशा उपकरणाचा वापर करणाऱ्याचा पाणीपुरवठा खंडित करू शकतात तसेच हे उपकरण जप्त करू शकतात आणि त्या ग्राहकावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येऊ शकते. ग्राहकाने पूर्ववतीकरणाचा खर्च दिल्याचा अपवाद वगळता जप्त केलेला पंप कुठल्याही परिस्थितीत परत केला जाणार नाही.”
भारतीय दंडविधानानुसारही हा गुन्हा आहे. भादंवि ४३०: सेक्शन ४३० नुसार पाटबंधाऱ्याच्या कामांना हानी पोचवणे वा पाणी बेकायदेशीरपणे वळवणे गुन्हा आहे.
जो कुणी खोडकरपणाने अशी कृती करेल ज्यामुळे शेतीसाठी, किंवा मन्व अथवा प्राण्यांच्या अन्न वा पिण्याच्या वापरासाठी किंवा स्वच्छतेसाठी किंवा उत्पादनासाठी पाणीपुरवठा कमी होईल किंवा होऊ शकेल, त्याला विहित काळासाठी, जो ५ वर्षांपर्यंत असू शकेल, कारावास किंवा दंड किंवा दोन्ही करण्यात येईल.
OCW-मनपाने नागरिकांना बूस्टर पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जागरूक नागरिकांना असेही आवाहन केले आहे कि, कुठेही बूस्टर पंप वापर आढळून आल्यास OCWच्या २४x७ नि:शुल्क मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर तक्रार करू शकतात, OCWच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात ७२८०९०३६३६ या क्रमांकावर अथवा झोन मॅनेजर/मनपा डेलिगेटला मनपा-OCW झोन कार्यालयात संपर्क करू शकतात.
विविध झोन्समधून १ मे ते १७ मे दरम्यान जप्त करण्यात आलेले पंप: