नागपूर:कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गा नगर येथे हत्येची घटना उघडकीस आली आहे. आज मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी ६६ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचा त्यांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या दारोडेखोराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृताचे नाव पापा शिवराव मडावी असे आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मडावी हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह (एक मुलगी आणि एक मुलगा ) कोराडी परिसराच्या बाहेरील दुर्गा नगर येथे राहत होते.
मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी आणि मुले मडावी यांना घरी एकटे सोडून कामावर निघाले.या दरम्यान, एका अज्ञात हल्लेखोराने घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मडावी यांनी प्रतिकार केला असता त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
मडावी यांची पत्नी दुपारी ४ वाजता घरी परतल्यानंतर आणि पोलिसांना कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि हत्येतील हत्यार जप्त केले. शेजारी घरे नसल्याने आणि पीडितेच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नसल्याने पोलिसांना तपासकार्यात अडचणीत येत आहेत. मात्र तरीही पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.