सत्तापक्ष नेत्यांसह संबंधित चमूने केले अंबाझरी उद्यानाचे निरीक्षण
नागपूर। नागपूर महानगर पालिकाद्वारे संचालित अंबाझरी उद्यानात अंदमान द्विप समुहात रॉस आयलंड वर बनलेल्या मल्टी मिडिया ध्वनी व प्रकाश प्रकल्पाचे आधारावर स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित शो चे निर्माण दक्षिण भारतातील ख्यातनाम अभिनेत्री रेवती यांच्या निर्देशनाखाली करण्यात येईल.
मागील महिन्यात अभिनेत्री रेवती यांनी स्वतः अंबाझरी उद्यानाचे निरीक्षण केले होते. आज त्यांच्या कंपनीच्या वतीने तांत्रिक संचालन शैलेष गोपालन यांनी मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, बांधकाम क्षेत्रातील सल्लागार सतीश साल्पेकर, विकासयंत्री राहुल वारके, कार्य अभियंता महेश गुप्ता, उपभियंता (उद्यान) सुधीर माटे, वास्तू शिल्पकार उदय गजभिये यांचे समवेत अंबाझरी उद्यान तसेच अंबाझरी ओव्हर फ्लो पॉइंटचे निरीक्षण केले.
या ठिकाणी हे उल्लेखनीय आहे कि, शैलेष गोपालन हे देशातील ख्यातनाम ग्राफिक्स डिझाईनर आहेत. सुप्रसिद्ध कौन बनेगा करोडपती, बिग बॉस, फिल्म फ़ेअर अवार्ड, फेमिना मिस इंडिया, नेशनल गेम २०१५ इ. सर्व कार्यक्रमाचे लाईट, साउंड तसेच ग्राफिक्स चे संयोजन त्यांनी केले आहे. अंडमान रॉस आयलंड वर केलेल्या प्रकल्पाचे देखील व्हिडीओ ग्राफिक्स त्यांनी केले आहे. महानगरपालिकेला या प्रकल्पाचे विस्तृत प्राकलन तयार करण्याचे उद्देशाने हा दौरा होता. यावेळी उप अभियंता विजय गभने, कनिष्ठ अभियंता राधेश्याम निमजे उपस्थित होते.