Published On : Fri, Apr 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

लोकसभा निवडणूक:अंतिम टक्केवारी जाहीर, नागपुरात ५० टक्के पेक्षा कमी तर गडचिरोली-चिमूर येथे सर्वाधिक ६५.८७ टक्के मतदान!

नागपूर:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले.महाराष्ट्रात विदर्भातल्या पाच मतदारसंघात निवडणुका होत झाल्या. या पाच जागांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४९.०७ टक्के टक्के मतदान झालं आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानला सुरूवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदार केंद्रावर जाऊन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आता मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली असून नागपूरमध्ये ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे. तर गडचिरोली-चिमूर येथे सर्वाधिक ६५.८७ टक्के मतदान झाले. भंडारा गोंदिया ५६.८७ टक्के, चंद्रपूर ५५.११ टक्के, रामटेकमध्ये ५२.३८ टक्के मतदान पार पडले.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement