Published On : Wed, Nov 21st, 2018

२७ नोव्हेंबरपासून नागपुरात ‘महापौर आपल्या दारी’

महापौर नंदा जिचकार जाणून घेणार प्रभागनिहाय समस्या : जनतेशी साधणार संवाद

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदयांच्या नागपूर महानगरपालिका क्षेत्रात झोननिहाय आयोजित जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आणि मा. पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने मा. महापौर नंदा जिचकार ह्या प्रत्येक प्रभागात जाऊन नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम शहरातील प्रभागांमध्ये राबविण्यात येणार आहे.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार संबंधित प्रभागांच्या नगरसेवकांसह आणि संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण ३८ प्रभागांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात प्रभागातील समस्या, जनतेचे प्रश्न आणि प्रलंबित कामांची माहिती जाणून घेणार आहेत. काही प्रश्नांवर तात्काळ निर्णयही घेण्यात येतील.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहे. या जनता दरबाराच्या तयारीच्या दृष्टीने आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना व्हावा, याअनुषंगाने सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नियोजित तारखांना हा उपक्रम सकाळी १० ते १ या वेळेत राहील. या दौऱ्यात महापौर नंदा जिचकार प्रभागातील नागरिकांशी संवादही साधणार आहेत.

असा राहील दौरा
‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांच्या दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. मंगळवारी झोन -प्रभाग क्र. १०, ११ (मंगळवार, दि. २७ नोव्हेंबर), प्रभाग क्र. १, ९ (बुधवार, दि. २८ नोव्हेंबर), आसीनगर झोन – प्रभाग क्र. ६, ७ (मंगळवार, दि. ४ डिसेंबर), प्रभाग क्र. २,३ (बुधवार, ५ डिसेंबर), लकडगंज झोन – प्रभाग क्र. ४,२३ (मंगळवार, दि. ११ डिसेंबर), प्रभाग क्र. २४, २५ (बुधवार, दि. १२ डिसेंबर), सतरंजीपुरा झोन – प्रभाग क्र. ५, २०, २१, (बुधवार, १९ डिसेंबर), गांधीबाग झोन – प्रभाग क्र. ८, १८ (शुक्रवार, दि. २८ डिसेंबर), प्रभाग क्र. १९, २२ (शनिवार, २९ डिसेंबर), धंतोली झोन – प्रभाग क्र. १७, ३३. ३५ (गुरुवार, १० जानेवारी २०१९), हनुमाननगर झोन – प्रभाग क्र. २९, ३१ (गुरुवार, दि. १७ जानेवारी २०१९), प्रभाग क्र. ३२, ३४ (शुक्रवार, दि. १८ जानेवारी २०१९), धरमपेठ झोन – प्रभाग क्र. १२, १३ (गुरुवार, २४ जानेवारी २०१९), प्रभाग क्र. १४, १५ (शुक्रवार, २५ जानेवारी २०१९), लक्ष्मीनगर झोन – प्रभाग क्र. १६, ३६ (शनिवार, २ फेब्रुवारी २०१९), प्रभाग क्र. ३७, ३८ (सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९), नेहरूनगर झोन – प्रभाग क्र. २६, २७ (सोमवार, ११ फेब्रुवारी २०१९), प्रभाग क्र. २८, ३० (मंगळवार, १२ फेब्रुवारी २०१९).

Advertisement