नागपूर: भारताच्या ७७ व्य स्वातंत्र्य दीनानिमित्त सर्वत्र विविध सोहळे होत असताना, महामेट्रो नागपूर येथे देखील या संबंधाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मेट्रो भवन – या महा मेट्रो नागपूरच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर यांनी तिरंगा फडकावला आणि तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली.
या निमित्त उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना, श्री श्रावण हर्डीकर यांनी शहरातील नागरिकांच्या आयुष्याची गुणवत्ता (quality of life) वाढवण्यात योगदान देत असल्याचे सांगत हे कार्य आपल्याला निरंतर करायचे असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मेट्रोच्या माध्यमाने नागरिकांची सेवा करण्याकरीत आपले अस्तित्व राहणार असल्याचे देखील ते म्हणाले. हि मूल्य आपल्याला जोपासायची आहेत असे देखील ते म्हणालेत.
नागपूर आणि पुणे येथे मेट्रो प्रकल्पाचे संचालन सुरु झाले असून पुढील काळात इतर विकसित शहरात देखील आपले प्रकल्प राहणार असल्याचे ते म्हणाले. महा मेट्रो एक प्रकल्प नाही तर हि एक संस्था असून या विकासाच्या जामात आपल्या सर्वांचा सहभाग राहणार असल्याचे ते म्हणाले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या करता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्मांना आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांना आपण वंदन करीत असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता पोलीस, जवान यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तसेच देशाला विकसित करणारे शेतकरी आणि मजुर वर्गाला देखिल आपण आजच्या या प्रसंगी नमन करू असे ते म्हणाले. देश स्वतंत्र झाला असला तरीही हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना घेता यावा या करता तशी व्यवस्था निर्माण करण्याची जवाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले.
या आधी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मेट्रो भवन येथे तिरंगा फडकवत मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिरंगा झेंड्याला सलामी दिली.