Advertisement
नासुप्र येथे भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना शहिद दिनानिमित्य विनम्र अभिवादन
नागपूर: सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज मंगळवार, दिनांक २३ मार्च रोजी शहिद दिनानिमित्त ‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा ‘नासुप्र’चे सभापती मा. श्री मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याहस्ते क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘नामप्रविप्रा’चे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार आणि कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर तसेच नासुप्र व नामप्रविप्राचे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.