Published On : Thu, Aug 10th, 2017

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

Advertisement

नागपूर: आज दिनांक ०९ ऑगस्ट रोजी उत्तर अंबाझरी रोड येथील नैवधम हॉल येथे आर्किटेक्ट,इजिनियर्स, आर्किटेक्ट , डेव्हलपर्स आणि अधिकारीवर्गाकरीता विकास कामाच्या परवानगी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त श्री. अनुपकुमार, महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, स्मार्ट सिटी चे डॉ. शेखर, आर्किटेक्ट असोसिएशन चे श्री. परमजीत सिंह आहुजा, आर्किटेक्ट श्री. अशोक मोखा उपस्थित होते. कार्यक्रमाची भारतीय परमरेनुसार दीप प्रज्वलन करून झाली. महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागीय आयुक्त यांचे स्वागत केले. तसेच इतर मान्यवरांचे स्वागत एनएमआरडीए चे अधीक्षक अभियंता, श्री. सुनील गुज्जेल्वार यांनी केले.

सदर कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्तविक भाषन महानगर आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी मांडली. यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले की आजचा दिवस हा क्रांती दिवस आहे याच पार्श्वभूमीवरव नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा मध्ये क्रांती चा दिवस मानला जात आहे. एनएमआरडीए ने नवी सुरवात आज केली आहे व चांगले कार्य करीत आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या महत्वाच्या पुढाकाराने जी.एस.टी. आणि रेरा कायद्या मुळे बदल घडतो आहे.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. म्हैसेकर संबोधित करते वेळी म्हणाले कि, नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा मध्ये विकास कामाची परवानगी ६० दिवसाच्या आत देण्याचा एनएमआरडीए चा मानस आहे. व आता पर्यंत एनएमआरडीए द्वारे २४७ विकास कामांच्या परवानगी देण्यात आल्या आहेत. नागपूर महानगर क्षेत्राच्या विकासाकरिता मेट्रो,महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र(MRSAC) मिळून कार्य करीत आहे.

” स्मार्ट सिटी ग्लोबल पैनल चे डॉ. शेखर यांनी स्मार्ट सिटी = स्मार्ट महानगर क्षेत्राच्या संदर्भात प्रस्तुतीकरण केले”.
डॉ. शेखर म्हणाले कि नागपूर महानगर क्षेत्र हे स्मार्ट महानगर क्षेत्रा मध्ये बदलतो आहे. विकास आणि एकीकरण हे स्मार्ट शहराची वाटचाल होत चालली आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा या क्षेत्राचा चेहरा बदलवील. स्मार्ट क्षेत्राच्या विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला पाहिजे. आर्थिक घडामोडी विकसित करण्यासाठी जनता आणि शासनाने एकीकृत होऊन काम करायला हवे. महानगर क्षेत्र हे शैशणिक आणि मेडीकल हब मध्ये बदल घेत आहे या ठिकाणी सरकारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट , प्रायव्हेट ईन्हवेसमेंट आणि विविध स्टेक होल्डर यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे .

“विभागीय आयुक्त श्री. अनुपकुमार – महानगर क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना अंतर्भूत करणे”

श्री. अनुपकुमार यांनी संबोधित करतांनी म्हटले कि, नागपूर हे भारतात एकमेव शहर आहे जेथे मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट, रॉ मटेरियल उपलब्ध आहे. बाकी शहरांच्या तुलनेमध्ये नागपूर हे शहर मुख्य गोल्डन वेळे मध्ये आहे ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वे,एनएचआय – सीमेंट रोड ची विकास कार्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नागरिकांना यावेळी त्रास सुद्धा सहन करावा लागतो आहे पण एक चांगले इंफ्रास्ट्रचर देखील निर्माण होत आहे. विदर्भाकडे आता विकासाच्या दृष्टीने बघितल्या जात आहे.

स्मार्ट सिटी निर्माण तयार करण्याकरीता स्मार्ट प्लानिंग ची देखील मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. कुठलेही शहर विकसित करण्यामध्ये आर्किटेक्ट हा मुख्य रोल प्ले करतो आणि चांगल्या प्लानिंग ने चांगले प्लेटफाम तयार होते.मेडीकल,टूरिजम( व्याघ्र प्रकल्प) नागपूर साठी एक केंद्र बिंदू आहे व सर्वात गतिशील असे महानगर शहर सुद्धा आहे.

या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र(MRSAC) च्या सहाय्यक शास्त्रज्ञ डॉ. सपना देवतळे यांनी सॅटॅलाइट मैपिंग वर प्रस्तुतीकरण केले, आर्किटेक्ट श्री. अशोक मोखा यांनी टी.ओ.डी, प्रधानमंत्री आवास योजना वर आर्किटेक्ट श्री. नागपूरे आणि आर्किटेक्ट असोसिएशन चे श्री. परमजीत सिंह अहुजा यांनी लॉजिस्टिक च्या संदर्भात प्रस्तुतीकरण दिले .

या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व आर्किटेक्ट डेव्हलपर्स बिल्डर्स यांच्या प्रश्नांचे उत्तर आणि शंकाचे निराकारण डॉ. म्हैसेकर,श्री. सुनील गुज्जेल्वार व उपस्थित तज्ञ यांनी केले

Advertisement