नागपूर/बुलढाणा: मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यात आमसरी फाट्यावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, नांदुऱ्याकडून खामगावकडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून ट्रक चालक गंभीरित्या जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.