Published On : Tue, May 17th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Advertisement

Nagpur Municipal Corporation : महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेचीही अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत यापुढे 38 ऐवजी 52 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार आता प्रभागांची संख्या 52 झाली आहे. या आधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या प्रभागाची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

156 नगरसेवक कसे असणार?
113 जनरल
31 एससी
12 एसटी

निवडणूकीसाठी 78 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारणपणे 47,067 च्या आसपास असणार आहे. 52 प्रभागांमध्ये कमी मतदान प्रभाग क्रमांक 48 मध्ये असणार आहे. या प्रभागात 41092 एवढे मतदान असणार आहेत. तर सर्वात जास्त जास्त मतदान प्रभाग क्रमांतक 51 मध्ये असेल. या प्रभागात 51 हजार 366 एवढे मतदान असेल.

31 प्रभागात 3 पैकी एक जागा एससीसाठी राखीव असणार आहे. 12 प्रभागात 3 पैकी 1 जागा एसटी राखीव असणार, 8 प्रभाग एस सी आणि एस टी राखीव असेल तर 17 प्रभागात जातीचे आरक्षण नाही. हे आरक्षण 2011 च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यावेळी झालेल्या जनगणनेत 24,47,494 एवढी लोकसंख्या होती.

Please click to know your Prabhag No.

Prabhag No. 1 | Prabhag No. 2 | Prabhag No. 3 | Prabhag No. 4 | Prabhag No. 5 | Prabhag No. 6 | Prabhag No. 7 | Prabhag No. 8 | Prabhag No. 9 | Prabhag No. 10
Prabhag No. 11 | Prabhag No. 12 | Prabhag No. 13 | Prabhag No. 14 | Prabhag No. 15 | Prabhag No. 16 | Prabhag No. 17 | Prabhag No. 18 | Prabhag No. 19 | Prabhag No. 20
Prabhag No. 21 | Prabhag No. 22 | Prabhag No. 23 | Prabhag No. 24 | Prabhag No. 25 | Prabhag No. 26 | Prabhag No. 27 | Prabhag No. 28 | Prabhag No. 29 | Prabhag No. 30
Prabhag No. 31 | Prabhag No. 32 | Prabhag No. 33 | Prabhag No. 34 | Prabhag No. 35 | Prabhag No. 36 | Prabhag No. 37 | Prabhag No. 38 | Prabhag No. 39 | Prabhag No. 40
Prabhag No. 41 | Prabhag No. 42 | Prabhag No. 43 | Prabhag No. 44 | Prabhag No. 45 | Prabhag No. 46 | Prabhag No. 47 | Prabhag No. 48 | Prabhag No. 49 | Prabhag No. 50
Prabhag No. 51 | Prabhag No. 52

 

 

Advertisement