नागपूर: नागपूर महानगरपालिका 8 रुपयात मुलांना नाश्ता आणि दुपारचे जेवण देणार आहे. केवळ मनपाच्या शाळांमधील प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळेल. त्यासाठी महानगरपालिकेने टेंडर काढले. मात्र या योजनेचा फायदा नेमका कुणाला मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
टेंडर मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे भरावे लागतात खिसे –
नागपूर महापालिकेचे हे टेंडर मिळविण्यासाठी ठेकेदारांना अधिकाऱ्यांचे खिसे भरावे लागते. ही कामे पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदार निविदेतील एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खिशात घालावे लागते.लुबाडणुकीचे हे गणित एवढ्यावरच थांबत नाही, तर काम मिळाल्यानंतर बिले काढण्यासाठी अधिकारी पुन्हा ठरावीक रकमेवर अडून राहतात.या साखळीचे खिसे भरावे लागत असल्यानेच ठेकेदार कागदोपत्री कामे दाखवून बिले हडप करीत आहेत.
योजनेचा फायदा विद्यार्थांना होणार की अधिकाऱ्यांना?
योजनेचा फायदा नेमका कुणाला मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थांच्या जेवणाच्या नावावर अनेकदा मनपा अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. टेंडर मिळविण्यासाठी केवळ जीएसटीच नाही तर आधी टेंडर मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना कमिशन द्यावे लागत.नंतर बिल काढण्यासाठी कमिशन, विविध विभागांचे लायसन्स फी आणि अधिकाऱ्यांना ऑफर द्यावी लागते. यानंतर चांगले जेवण द्यावे लागते, देता येत नसेल तर तक्रार करा आणि नंतर अधिकाऱ्यांना माल वाटून तक्रार निकाली काढा. अप्रतिम योजना, फक्त फायदे, फक्त फायदे ते कुणाचे तर केवळ अधिकाऱ्यांचे आणि टेंडर मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्यांचे. मात्र यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर मनपाच्या शिक्षण विभागाची जाहिरात –
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने नुकतीच जाहिरात देत निविदा काढली आहे. याअंतर्गत विद्यार्थांना 8 रुपयात जेवण आणि नास्ता देण्यात येईल.सदर ई-निविदा जाहिरात सविस्तरपणे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
उपरोक्त कामाची निविदा संगणकावर ई निविदा प्रक्रियेद्वारे ऑनलाईन पध्दतीने करणेत येईल निविदा कामाबाबतची माहिती वरीलप्रमाणे संकेतस्थळावर उपलब्ध असून ती वर दिलेल्या कालावधीत डाऊनलोड करून घेता येईल. निविदेत दिलेला अर्जाचा नमुना भरुन त्यासोबत आवश्यक सर्व दस्ताऐवज जोडून संकेतस्थळावर Upload करणे आवश्यक राहील.