Published On : Tue, May 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेची आदरांजली

Advertisement

नागपूर: अतुल्य साहस आणि असीम राष्ट्रभक्ती, मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयाशक्ती, समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता, हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेचे केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वीर सावरकरांच्या तैलचित्राला मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, सहा. आयुक्त श्री. महेश धामेचा,अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. सतीश गुरनुले, श्री. राजीव गौतम, निगम अधिक्षक श्री. श्याम कापसे, सहा. अधिक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, सुधीर कोठे, अमोल तपासे, राजेश गजभिये, राजेश लोहीतकर, प्रकाश खानझोडे, रजत मुंडे, विनोद डोंगरे आदी मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते तसेच शंकर नगर चौक स्थित वीर सावरकर यांच्या पुतळयाला श्री. श्यामजी पत्तरकीने, किसन बारई यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Advertisement
Advertisement