नागपूर- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही “१४ एप्रिल अग्निशमन सेवा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ दरम्यान “अग्निशमन सेवा सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम सोमवारी, १४ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील हिरवळीवर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे पार पडणार आहे. यावेळी अग्निशमन सेवेत कार्य करताना प्राणार्पण करणाऱ्या शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर पथ संचलन आणि यंत्रसामग्रीचे निरीक्षण होईल.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. श्री. अभिजित चौधरी (आयुक्त, म.न.पा., नागपूर), श्रीमती सुमन पंत (अति. आयुक्त – शहर), श्रीमती वैशाली बी. (अति. आयुक्त – सेवा) , अजय चारगुंडा (अति. आयुक्त – सामान्य) आणि मनपाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी भिमराव चंदनखेड़े हे उपस्थित राहणार आहे.