नागपूर महानगरपालिका ‘इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (IITMS) सुरू करणार आहे. या एआय पॉवर प्रणालीच्या वापरामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल.यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिस विभागालाही मदत होईल.
शहरातील सर्व 164 स्वयंचलित वाहतूक नियंत्रक आयआयटीएमएस प्रणालीसह अपग्रेड केले जातील. हे मुख्य सर्व्हरशी जोडल्यानंतर वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत. या बदलामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या व्यवस्थेसाठी 197 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी नागपूर महापालिकेच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.