नागपूर : काही दिवसांपूर्वी शहरातील जरीपटका परिसरात नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत शीख समुदायाचे धर्मगुरू गुरुगोबिंद सिंग यांचे पोस्टर काढले आहे.तसेच या पोस्टर्सना पायांनी फोल्ड केल्याची धक्कादायक कृती केली होती. यामुळे समुदायाच्या लोकांच्या भावना दुखल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच समाजबांधवांनी यांचा निषेध करत धरणे आंदोलन केले. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता वेदप्रकाश आर्य यांनी ‘नागपूर टुडे’च्या टीमसोबत संवाद साधला. तसेच नागपूर महानगर पालिका भाजपचे होर्डिंग काढण्याची हिम्मत दाखवत नाही, असा घाणघातही त्यांनी केला.
नागपूर शहरात सार्वजनिक परिसरात विविध प्रकारचे अवैध होर्डिंग लागले आहेत.मात्र नागपूर मनपा ज्याठिकाणाहून राजकीय फायदा होत नाही त्याच ठिकाणी कारवाई करते. अनेक भागात अद्यापही भाजपचे होर्डिंग लागले आहेत. मात्र ते होर्डिंग हटविण्याची नागपूर महानगर पालिकेला हिम्मत होत नाही. मनपा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी सज्ज असते, असा आरोप आर्य यांनी केला.
नागपुर महानगर पालिकेचे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा प्रचार होऊ नये म्हणनूनही त्यांचे होर्डिंग काढून टाकतात. भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी मनपाचे अधिकारी अशा प्रकारची कारवाई करतात, असेही आर्य म्हणाले.
नुकतेच जरीपटका येथे एका दुकानदाराने आपल्या खाजगी जागेवर गुरुगोबिंद सिंग यांचे पोस्टर लावले होते. मात्र हे पोस्टरही नागपूर मनपाच्या मंगलवारी झोनच्या अधिकाऱ्यांनी काढले. नुकतेच अयोध्येत श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडला .आम्ही भावना श्रीरामाचे भक्त आहोत.आम्हाला कुणाचा भावना दुखावयाचा नाहीत.पण भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण नागपुरात अवैध ठिकाणीही पोस्टरबाजी केल्याचे चित्र आहे,असेही वेदप्रकाश आर्य म्हणाले.