नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालय(दक्षिण) क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मौजा.-पाचगाव,ख.क्र. २८९/१,२ येथील आडवाणी धाबा व बार चे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही आज दिनांक ०१.१०.२०१८ रोजी अंशत: करण्यात आली. कार्यवाही दरम्यान धाबा मालकाने कार्यवाही थांबविण्याची विनंती केली व लागणारा दंड भरण्यास संमती दिली.
मंजुरीकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडे नकाशे सादर करतील. तसेच धाबा मालकाने केलेल्या अनधिकृत बांधकामास रु. ४,५०,०००/- चा दंड लावण्यात आला व हि कार्यवाही तूर्तास थांबविण्यात आली. या कार्यवाहीत सहाय्यक अभियंता श्री.अनिलकुमार अवस्थी,अतिक्रमणपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील,श्री.सुरज कोटकर यांच्या नेतृत्वात पार पडली.
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम मंजूर/नियमित करून घेण्याकरिता अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ३०.१०.२०१८ पर्यंत असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय मार्फत सूचित करण्यात येत आहे.