जनरल डब्यात वसूली सुरूच
सूरक्षा व्यवस्था मुकदर्शी
नागपूर: तृतियपंथीयांनी नागपूर आऊटरला आपला अड्डा बनविला आहे. लोखंडी पुल ते मनपा पुलापर्यंत त्यांचीच मक्तेदारी आहे. याच ठिकाणाहून ते गाडीत चढतात- उतरतात आणि वसूलीही करतात. याविषयी लोहमार्ग पोलिसांना माहिती असूनही तृतियपंथीयांवर कारवाई होताना दिसत नाही, याचे प्रवाशांना आश्चर्य वाटते. त्याच प्रमाणे आरपीएफकडूनही काहीच होत नाही. याप्रकारामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
धावत्या रेल्वेत चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रवाशांचे मोबाईल, बॅग, पर्स व इतर महत्वपूर्ण दस्ताऐवज चोरत आहेत. यावर अद्यापही नियंत्रण मिळविता आले नाही. अशातच तृतियपंथीयांनी आपला जत्था पुन्हा रेल्वेकडे वळविल्याने जनरल बोगीतील प्रवाशांना धडकी भरली आहे.
आऊटरवर गाड्यांची गती कमी होते. बहुतेकवेळा सिग्नल न मिळाल्याने गाडी थांबून असते. याच संधीचा फायदा घेत तृतियपंथी याच अड्ड्यावरून जत्थ्याने गाडीत चढतात. आणि उतरतात. प्रवाशांकडून अगदीच कमी वेळात हजारो रुपये एका गाडीतून वसूल केली जाते. त्यामुळे दरदिवशी ये-जा करणाºया गाड्यातून हे तृतीयपंथीय सरार्सपणे हजारोंची वूसूल करीत आहे.
याबाबतीत लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफला माहिती असली तरी अशा खुले आम वसूली करणाºयाविरूध्द अद्यापही कारवाई होतांना दिसत नाही. एखाद्या प्रवाशाने पैसे दिले नाही तर कुटुंबीयांसमोर मान खाली घालायला लावणारे कृत्य करतात. धमकी, मारहाण आणि बळजबरीही करतात. सततच्या या प्रकारामुळे प्रवाशांना धडकी भरली आहे. तृतियपंथीयांच्या वाढत्या प्रकारामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याबरोबर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.