नागपूर : नागपूरच्या सायबर पोलिसांनी बिहारमधील तीन 3 सायबर चोरट्यांना अटक केली आहे. या चोरटयांनी शहरातील प्रॉपर्टी डीलरची 20.35 लाख रुपयांची फसवणूक केली.
गणेश सरयुग पासवान (३९), रविरंजन कुमार योगेंद्र पासवान (२५) आणि रोहित कुमार सहदेव पासवान (२२) अशी या आरोपींची नावे असून ते बिहारी बिघा, पोस्ट माफी, पंचायत काथरी, जिल्हा नालंदा, बिहार येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील गणेशपेठ बस टर्मिनसजवळील घर क्रमांक B7, राहुल कॉम्प्लेक्स 1 येथे राहणारे प्रॉपर्टी डीलर शैलेंद्र कृष्णभूषण चौधरी (51) यांना 2023 मध्ये ट्रेंट लिमिटेड (टाटा एंटरप्रायझेस) चे झुडिओ स्टोअर सुरू करायचे होते. कंपनीच्या वेबसाइटवर त्यांनी अर्ज दिला. आरोपी तिघांनी मिळून कंपनीचा बनावट मेल आयडी तयार केला. त्यानंतर त्यांना कंपनीचा बनावट फॉर्म पाठवला. त्याने फॉर्म भरल्यानंतर, त्यांनी त्याला पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात नोंदणी आणि प्रक्रिया शुल्कासाठी 20.35 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर पैसे काढून पळ काढला.
चौधरी यांच्या तक्रारीनंतर, नागपूर सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध नुसार गुन्हा नोंदवला. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक बिहारमधील नालंदा येथे गेले. पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.