नागपूर : शहरात पुन्हा सट्ट्याचा काळाबाजार उघडकीस आला आहे. आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्याचा डाव नागपूर पोलिसांनी उधळून लावला. आयपीएल क्रिकेट टोर्नामेंट मध्ये मुंबई वि. पंजाब पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा स्वीकारल्याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने बुधवारी एका ३६ वर्षीय बुकीला अटक केली. नितेश किशोर चौधरी (वय 36 वर्ष रा. प्लॉट न 8, भगवान नगर) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, नागपूर पोलसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 पथकाने IPL क्रिकेट टोर्नामेंट मध्ये मुंबई वि. पंजाबची टी 20 क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या चौधरी विरोधात कारवाई केली.
आरोपीकडून मल्टी मॉडेलच्या मोबाईल व लाईनचे मोबाईल असे दोन फोन, सॅमसंग कंपनीचा टीव्ही व सेट टॉप बॉक्स इतर साहित्यासह एकूण 79010 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी चौधरीवर महाराष्ट्र जुगार (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्याला अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.