Published On : Mon, May 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 27 जणांचे बंदूक परवाने केले रद्द

Advertisement

नागपूर : शहरातील वाढत्या ‘गन कल्चर’ ला आळा घालण्यासाठी शहर पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. कुमार यांनी 2020 पासून 27 बंदुक परवाने रद्द केले आहेत. ज्यामध्ये यावर्षीचे पाच महिन्यातील 10 परवाने आहेत. नागपूर ‘शस्त्रमुक्त’ करण्याचे सीपीचे उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांकडून कायदेशीररीत्या बंदुक बाळगण्याचे परवाने काढून घेण्याबरोबरच, कुमारने नागपुरात पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा या दोन्ही स्तरांवर बंदुकांसह शस्त्राविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. एप्रिलपर्यंत, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सुमारे 181 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, ज्यात दोन बंदुकांचा समावेश होता. व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते , सट्टेबाज असोत कुमार यांनी त्यांच्या मागील गुन्ह्यांच्या नोंदींचा हवाला देऊन काही कालावधीतच त्यांचा शस्र्त्र परवाना राद्द केला आहे. शहरात सुमारे 1,900 ते 2,000 शस्त्र परवानाधारक आहेत या सर्वांवर पोलीस आयुक्तांची नजर असल्याचे बोललले जात आहे.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शस्त्र परवानाधारकाकडून बंदुकांच्या गोळ्या चालविण्यात येणे, त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर भितीदायक पद्धतीने पोस्ट करणे आणि नियमांचे उल्लंघन करून त्यांचा गैरवापर करण्याचा इतर कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही.दुकांचा गैरवापर झाला असेल तर ते अशी शस्त्रे ठेवू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. नागपूर पोलीस शस्त्रास्त्र संस्कृती, विशेषत: बंदुकांबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबत आहेत. कुमार म्हणाले, कोणताही परवाना निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सर्व कायदेशीर औपचारिकता आणि सुनावणी पूर्ण करण्यात आली होती.भूतकाळातील शस्त्रास्त्र कायद्याच्या नोंदी असलेल्या सर्व गुंडांची नियमितपणे तपासणी केली जात आहे आणि नवीन दृष्टीकोनातून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.

    Advertisement
    Advertisement