Published On : Wed, May 3rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून 1,109 पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या !

Advertisement

नागपूर : नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेगवेगळ्या युनिट्समध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या अनुषंगाने 1,109 पोलिसांच्या बदल्या केल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर प्रक्रियेत पात्र उमेदवारांपैकी प्रत्येकाशी बोलल्यानंतर कुमार यांनी पोलिसांच्या बदल्या केल्या.

2022 मध्येही कुमार यांनी तीन तासांत संक्षिप्त मुलाखतींसह प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अशाच पद्धतीने 837 पोलिसांच्या बदल्या केल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी पहिल्यादांच पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आदेश जारी करण्याचा ट्रेंड शहरात सुरू केला आहे. दरम्यान आताच्या बदल्यांमध्ये सुमारे 125 सहाय्यक उपनिरीक्षक, 319 हेड कॉन्स्टेबल, 274 नाईक पोलिस कॉन्स्टेबल आणि 325 कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

Gold Rate
09 April 2025
Gold 24 KT 89,200/-
Gold 22 KT 83,000/-
Silver / Kg - 90,400/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस आयुक्ताच्या दुसऱ्या नव्या निर्णयात पोलिस स्टेशन नियंत्रण कक्षाला वेगवेगळ्या युनिटमधील सर्व अधिकाऱ्यांचा डेटा संकलित करण्यास सांगितले होते जे दीर्घ कालावधीत एकतर अनुपस्थित आहेत किंवा आजारी रजेवर आहेत.

कुठल्या ना कुठल्या कारणाने कर्तव्य बजावत नसलेल्या अधिकाऱ्यांवर कुमार यांनी कठोर कारवाईची योजना आखल्याचे कळते.

आणखी एका कारवाईत, कुमार यांनी वरिष्ठ निरीक्षक राजकमल वाघमारे यांच्याविरुद्धच्या मिळालेल्या तक्रारींनंतर त्यांना विशेष शाखेत पाठवले आहे. वाघमारे यांच्या जागी प्रशांत माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement