नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शहरात सर्वात जास्त काळ कार्यरत असलेल्या पोलीस आयुक्तांपैकी एक बनणार आहेत. राज्य सरकारकडून अमितेश कुमार यांना नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावर राहण्यासाठी एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे.
नियमांनुसार, एखाद्या अधिकाऱ्याची एकाच ठिकाणी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली करता येत नाही, परंतु सरकारच्या प्रशासकीय निर्णयाच्या आधारे त्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात वाढ करण्यात येते.
अमितेश कुमार पोलीस आयुक्त म्हणून या वर्षी सप्टेंबरमध्ये नागपुरात तीन वर्षे पूर्ण करणार आहेत, ज्यामुळे ते शहरातील सर्वाधिक काळ देणारे पोलीस अधिकारी ठरतील.
अमितेश कुमार यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. सरकारमधील सूत्रांनी पुष्टी केली की ते आणखी एक वर्ष नागपूरचे पोलीस आयुक्त राहणार आहेत. माझ्या बदलीबद्दल मला सरकारकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. मला कोणताही आदेश मिळाल्यास त्याचे पालन केले जाईल, असे कुमार म्हणाले आहेत.
नागपुरात अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त म्हणून केलेली कामगिरी उल्लेखनीय आहेत. शहरात त्यांनी स्वतःचे गुप्तचर नेटवर्क विकसित केले आहे, हे विशेष.