नागपूर: शहरात गुन्हे तपास क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.आज गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पाच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अधिकृतपणे सुरू करण्यात आल्या.
या पाचही व्हॅन नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी सिव्हिल लाईन्स येथील पोलिस भवन येथे एका समारंभात झोन १ ते ५ च्या पोलिस उपायुक्तांना (डीसीपी) सुपूर्द केल्या.
भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-२०२३ कायद्याच्या अंमलबजावणी करीता महाराष्ट्रात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.
या निर्णयानुसार एकूण ५ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन परीमंडळीय पोलीस उप आयुक्त नागपुर शहर (०१ ते ०५) यांना सुपुर्द करण्यात आल्या.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वीत करण्याकरिता प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपुर येथील उपसंचालक समन्वयक डॉ. विजय ठाकरे यांनी अथक परीश्रम घेऊन. त्यामध्ये एकूण १६ किट तयार करून प्रत्येक मोबाईल व्हॅनमध्ये समाविष्ट करून कार्यान्वीत केल्या प्रत्येक व्हॅन ही वातानुकूलित आहे. त्यामध्ये संगणक तसेच प्रिंटर्स, फिज आणि वेळीच केमिकल ॲनालीसीस करण्याकरीता त्याचप्रमाणे सायबर गुन्हे किंवा विस्फोटक पदार्थासंबंधी गुन्हे घडल्यास त्यावर तात्काळ परीक्षण करण्यासाठी सामग्री उपलब्ध आहे. प्रत्येक वाहनामध्ये क्राईम-सिन कव्हर करण्या साठी अत्याधुनिक कॅमेरा लावण्यात आलेला आहे. प्रत्येक व्हॅनमध्ये ०१ फॉरेन्सिक लॅबोरेटरी अधिकारी, सहायक, तथा अटेंडंट व पोलीस कर्मचारी आणि वाहन चालक उपलब्ध राहणार असून, त्यामध्ये महीला व पुरुष दोन्ही अधिकारी असतील.
फॉरेन्सिक तज्ञ हे घटनास्थळाहुन गोळा केलेले नमुने संबंधीत तपासी अधिकारी यांना क्राईम सिन रिपोर्ट सह तयार करून देतील.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हस्तांतरण कार्यक्रमात रविंद्र सिंगल (पोलीस आयुक्त) संजय पाटील (अपर पोलीस आयुक्त,गुन्हे) पोलीस उप आयुक्त राहूल माकणीकर, श्वेता खेडकर, लोहीत मतानी, राहुल मदने, अर्चित चांडक, महेक स्वामी, रश्मीता राव, श्रीमती अश्वीनी पाटील तसेच, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूरचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे आणि सहायक संचालिका श्रीमती वैशाली महाजन हे व पोलीस अधिकारी व अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते.