नागपूर: शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध ८ मतमोजणी केंद्रांवर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया ही शांतता पार पडावी याकरिता नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आज सिव्हिल लाईन्स स्थित “पोलीस भवन” येथील ऑडिटोरियम हॉल येथे बैठक घेतली. या बैठकीस नागपूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व वाहतूक प्रभारी, सर्व गुन्हे शाखा प्रभारी, सर्व पोलीस उपायुक्त, सर्व सहायक पोलीस आयुक्त, तसेच अपर पोलीस आयुक्त यांचे सहपोलीस आयुक्त यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मतमोजणी दरम्यान शांतता राखण्यासाठी विविध महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी स्ट्रॉंग रूम्स आणि मतमोजणी केंद्रांचा चोख बंदोबस्त राहावा याकरिता प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून त्यांनी केलेली आखणी बाबत आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून असामाजिक तत्वांवर कडक नजर ठेवण्यात यावी. वाहनं, मेगाफोन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, तसेच ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवण्याबाबत व्यवस्था करावी असे पोलीस आयुक्तांनी बैठकीदरम्यान निर्देश दिले. पोलीस आयुक्तांनी यावेळी मतमोजणीसाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर विशेष सुरक्षा आराखडा , विजयी उमेदवारांच्या रॅलीदरम्यान वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था या मुद्द्यांवर चर्चा केली.
बैठकीमध्ये क्राइम ब्रँचला मतमोजणीच्या अनुषंगाने सतर्क राहण्यास सांगून असामाजिक तत्व, गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर यांच्यावर नियंत्रण ठेवणे बाबत निर्देश दिले. मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी “मानसशास्त्रीय उपायांवर” भर दिला जावा, ड्रोनच्या मदतीने मतमोजणी केंद्रांवर ठेवणे, केंद्र व राज्य राखीव पोलीस दल (CAPF, SRPF, CRPF, RCP) यांचा प्रभावीपणे वापर , गोपनीय यंत्रणा अधिक सक्रिय करणे, संभाव्य कायदा सुव्यवस्थेच्या बिघाडाला प्रतिबंध करण्यासाठी नोटिसा तामील , विशिष्ट संवेदनशील भागांची ओळख करून त्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करणे, इत्यादी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त पाटील, प्रमोद शेवाळे , डॉ. शिवाजी राठोड, यांच्यासह पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व ठाणे प्रभारी यांनी त्यांनी केलेल्या उपाययोजना आणि अंमलबजावणी बाबत पोलीस आयुक्त यांना या बैठकीदरम्यान पूर्वतयारी बाबत सूचना केल्यात व सदर सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले. बैठकीमध्ये पोलीस आयुक्त यांनी मतमोजणी पूर्व बंदोबस्त आराखडा, अंमलबजावणी, नियोजन इत्यादी मुद्द्यांवर भर देऊन सर्वांनी सजग आणि सतर्क राहावे याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या