नागपूर : नागपूर शहरातील जरिपटका रोडवर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका तरुणाने पोलिसाला हेल्मेट का घातलं नाही? असा प्रश्न विचारल्यानंतर पोलीस अधिकारी संतापला आणि त्याने थेट तरुणाच्या कानशिलात लगावली. यासोबतच पोलिसाने तरुणाला शिवीगाळही केली. संबंधित पोलिसाचे म्हणणे आहे की, दात दुखत असल्याने त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बी
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, नागरिकांचा संताप
या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्याच्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. काहींनी तरुणाच्या धाडसाचं कौतुक करत, हा तरुण एक जबाबदार नागरिक आहे, असल्याचे म्हटले आहे.
पोलीस विभागाकडून चौकशी सुरू-
या प्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला म्हटलं की, आरोग्याच्या कारणास्तव हेल्मेट घालणं शक्य नव्हतं,” मात्र कायद्याच्या रक्षकानेच नियम तोडल्याने आणि त्यावर प्रश्न विचारणाऱ्याशी गैरवर्तन केल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.