Advertisement
नागपूर :शहारात उन्हामुळे नागरिक बेहाल होत असून यापार्श्वभूमीवर नागपूर महानगर पालिकेने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी पाऊले उचलली आहेत. पालिकेने विविध चौकातील सिग्नलवर ‘ग्रीननेट’ लावल्या आहेत.त्यामुळे वाहनचालकांना उन्हापासून दिलासा मिळेल.
गेल्या वर्षी महानगर पालिकेने शहरातील काही भागात हा उपक्रम राबविला होता.
शहरात मे महिन्याच्या सुरुवातीला जरी उन्हाची तीव्रता जास्त नसली तरी अखेरीच वतापाच्या कालावधीत उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने रिझर्व्ह बँक चौक, जीपीओ चौक, लॉ कॉलेज चौक, शंकरनगर आणि मानेवाडा चौकात ‘ग्रीननेट’ लावले त्यामुळे वाहनचालकांना तापत्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे.