नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गेल्या २४ तासात ठिकठिकाणी झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत नारा गावाजवळील नांदेड बांगडी कारखान्याजवळ महेश उईके नावाच्या व्यक्तीची रॉडने हत्या करण्यात आली .ही घटना रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
तर दुसरीकडे घटना काल रात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत खरसोली गावात घडली .रेखा सुखदेव उईके, सुखदेव उईके यांच्यावर ओरोपी दिनेश पाटील यांनी खुनी हल्ला केल्याची माहिती आहे.या घटनेत जखमींची प्रकृती चिंताजनक असून, सध्या 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
तर तीसरी घटना गट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत घडली . काटोल नाक्याजवळील नाल्याच्या बाजूला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला आहे. याप्रकरणी गट्टीखदान पोलीस आणि क्राईम ब्रँच टीमने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे .