नागपूर: नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
जामठा परिसरातील वृंदावन सिटी येथील पोद्दार यांच्या अधिकृत बंगल्यात तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी घडली.
जखमी पोलिसाला तातडीने उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलण्याचा प्रयत्न केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. मानसिक ताण, वैयक्तिक समस्या या पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्याचे प्रयत्न करण्याचे कारण असू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार शेयर मार्केटमध्ये लॉस झाल्याने सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.