नागपूर : शहरातील सदर फ्लायओव्हरवर बुधवारी दुपारी एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.याप्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला.
सदर पोलीस ठाण्या अंतर्गत लिबर्टी चौकातील फ्लायओव्हरवर बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.ओला कार चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली.सुधाकर पाटील असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असून तो नागपुरात काम करतो, चौकशीत दुचाकीस्वाराच्या खिशात देशी दारूचे दोन बाटल्या आढळून आल्या.या अपघाता प्रकरणी सदर पोलिसांनी कार चालक चंद्रकांत इंगोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला.