Published On : Thu, Dec 14th, 2023
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

नागपूर अधिवेशन: विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनदरम्यान ‘जय श्री राम’चा नारा !

Advertisement

नागपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या विधानसभेचे फोटो सेशन झाले, या फोटो सेशनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार सहभागी झाले होते.मात्र यात विशेष म्हणजे या फोटो सेशनदरम्यान अनेक आमदारांनी ‘जय श्री रामचा’ नारा लगावला.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस, विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन पार पडले.

Advertisement

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मध्यभागी तर त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले.फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये गप्पा आणि हास्यविनोद रंगल्याचे पाहायला मिळाले.