नागपूर : देशातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून उपराजधानी नागपूरची ओळख होती. मात्र दिवसेंदिवस येथे गुन्हेगारी वाढतच चालली आहे.शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
उपराजधानीत गेल्या आठवडाभरात सात खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी तीन खून रविवारी घडले.
धंतोली परिसरात तिघांनी एकाचा चाकूने भोसकून खून करून रस्त्यावर फेकून पळ काढला. आठवड्याच्या सुरवातीलाच अजनीत बापलेक हत्येची घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी कुलदीप चव्हाण नावाच्या युवकाचा मित्रानेच खून केला. दोन दिवसांपूर्वी यशोधरानगरमध्ये वहिणीशी
अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचाही राजा नामक युवकाने खून केल्याची घटना समोर आली.
रविवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील भारतीय प्रोटेस्टंट खिचन कब्रस्थान येथे आला. तो सरळ चौकीदार रमेश शेंड याच्या दिशेने चालत गेला. शेंडे यांचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर सपासप वार केले. त्याचवेळी कब्रस्थानात अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहोचवले तर आरोपीला किरण यांनी पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला.
हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरिपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
रविवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील भारतीय प्रोटेस्टंट खिचन कब्रस्थान येथे आला. तो सरळ चौकीदार रमेश शेंड याच्या दिशेने चालत गेला. शेंडे यांचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर सपासप वार केले. त्याचवेळी कब्रस्थानात अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहोचवले तर आरोपीला किरण यांनी पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरिपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.