Advertisement
नागपूर : शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता वानाडोंगरी परीसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका युवकाचा चार ते पाच युवकांनी जबर मारहाण केल्यानंतर खून केला. कुणाल उर्फ बॅटरी सुनील कन्हेरे (२२,रा. गेडाम ले आउट, आय सी चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
माहितीनुसार, वानाडोंगरी -संगम रोडच्या बाजूला अष्टविनायक वसाहतीच्या पाठीमागे एका ओसाड ले आउटमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह या मार्गाने जाणाऱ्या वाटसरूला दिसला. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.तसेच कुणालचा मृतदेश शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. काही तासापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासादरम्यान सांगितले.