Published On : Thu, Jul 29th, 2021
By Nagpur Today Nagpur News

“इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार जाहीर

Advertisement

नागपूर : नागपूरसाठी ही आनंदाची बाब आहे. केन्द्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशन तर्फे राबविण्यात आलेल्या “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी स्मार्ट सिटी टीमचे यासाठी अभिनंदन केले आहे.

केन्द्रीय गृह निर्माण व शहरी विकास विभागाचे सचिव श्री दुर्गाशंकर मिश्रा यांनी चॅलेंज मध्ये निवड करण्यात आलेल्या ११ शहरांची घोषणा केली. यामध्ये नागपूर शहराचाही समावेश आहे. यावेळी स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर आणि सह सचिव श्री कुणाल कुमार, आई.टी.डी.पी.च्या साऊथ ईस्ट रशिया प्रोग्राम चे प्रमुख श्रेया गाडेपल्ली सुध्दा उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या ११ शहरांमध्ये महाराष्ट्रातून नागपूर आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी सांगितले की, नागपूर मध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यात नागरिकांना सहभागी करुन घेतले होते. मागील वर्षभरात स्मार्ट सिटी तर्फे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान – लहान उपाय करुन सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले गेले. नागपूर शहरात सायकलिंग करिता आवश्यक सुधारणांसंबंधी १५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सोबतच नागरिकांमध्ये वातावरण निर्मिती करुन त्यांना रोजच्या कामांसाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले गेले. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकलला प्राधान्य दयावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हॅन्डल बार सर्वे करण्यात आले. नागपूर स्मार्ट सिटी आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तसेच नागपूर शहरासाठी १८ किमीचा डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ.अमित समर्थ यांचे सहकार्य प्राप्त झाले. तसेच यू.एम.टी.सी. व हर्षल बोपर्डीकर, अर्बन प्लानर यांचेसुध्दा सहकार्य प्राप्त झाले. शापुर्जी पॅलनजी कंपनी व सोलर एक्सप्लोजिव कंपनी यांच्या तर्फे सी.एस.आर निधीतून आर्थिक सहकार्य प्राप्त झाले. तसेच फन प्लॅनेटकडून १० सायकल देण्यात आल्या. “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” उपक्रमाचे प्रोजेक्ट लिड डॉ. पराग अर्मल होते. या कार्यात केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे मागदर्शन लाभल्याबददल डॉ. उमरेडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement