नागपूर : शहरात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे मोरभवन बसस्थानकाची दुरावस्था पाहायला मिळाली होती. यावर ‘नागपूर टुडे’ने प्रकाश टाकत स्थानिकांच्या आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी बसस्थानकावर सर्व प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.
मोरभवन बसस्थानकावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होतो. बसस्थानकातील शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदीचा आढावा यावेळी चौधरी यांनी घेतला. यावेळी त्यांनी बसस्थानकाची जागा समतल करण्याच्या कामाबद्दल असमाधान व्यक्त करून कामात सुधारणा करण्याचे निर्देश चौधरी यांनी दिले.
पावसाळा सुरु होताच नागपुरातील मोरभवन बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. कारण स्थानकात पाणी साचल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसते.यावर काही दिवसांपूर्वी ‘नागपूर टुडे’ने बस्थानाकच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकत नागरिकांशी संवाद साधला. या बसस्थानकात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था नसल्याने स्थानकात सतत पावसाचे पाणी साचते.
पावसाळ्यात दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते असते. मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे येथील प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बसस्थानकामध्ये जागोजागी चिखल झाल्याने येथे येणाऱ्या प नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मगणी प्रवाशांनी केली होती.