नागपूर :राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नागपूरच्या सहाही विधासभा मतदारसंघाचा ‘नागपूर टुडे’ने आढावा घेतला. यानुसार कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. यावर प्रकाश टाकण्यात आला.
नागपूरच्या दक्षिण-पश्चिममधून फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे लढत-
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.तर काँग्रेसने त्यांच्या विरोधात प्रफुल्ल गुडधे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दोन्ही नेत्यांमध्ये यंदा ‘कांटे की टक्कर’ आहे. मात्र या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
मध्य नागपुरात प्रवीण दटके विरुद्ध बंटी शेळके सामना-
मध्य नागपुरात भाजपने प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून बंटी शेळके हे निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघात सध्या बंटी शेळके यांची हवा असून ते निवडणूक जिंकू शकतात, असा अंदाज लावण्यात येत आहे.
उत्तर नागपुरात काँग्रेचे राऊत विरुद्ध भाजपचे माने यांच्यात लढत-
उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार नितीन राऊत यांच्या विरोधात भाजपने मिलिंद माने यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघाचा विकास झाला नाही, असा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र तरी देखील या मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार नितीन राऊत यांची पकड मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्व नागपुरात भाजपचे खोपडे विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेठे यांच्यात लढत-
पूर्व नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नेते दुनेश्वर पेठे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र या मतदारसंघातून कृष्णा खोपडे याचे पारडे जड असून ते दुनेश्वर पेठे यांना पराभूत करू शकतात असे बोलले जात आहे.
दक्षिण नागपुरात कांग्रेसचे पांडव विरुध्द भाजपाचे मते यांच्या लढत-
दक्षिण नागपुरात कांग्रेसने गिरीश पांडव यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे मोहन मते उतरणार आहेत. या मतदारसंघात दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असून यंदा गिरीश पांडव यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसते.
पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात लढत –
पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात विकास ठाकरे यांची पकड असून ते सुधाकर कोहळे यांना धूळ चारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.