OCW टँकर चालकांना वाहतुकीचे मार्गदर्शन
नागपूर : पोलीस आयुक्त कार्यालय -नागपूर शहर वाहतूक विभाग तर्फे सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान -२०२२ (१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी) अंतर्गत ऑरेंज सिटी वॉटर च्या जवळपास ६० टँकर वाहन चालकांना ट्रॅफिक सिग्नल, ट्रॅफिक नियम, ट्रॅफिक कायदे आणि सुरक्षित वाहन चालविताना घ्यावयाची खबरदारी ह्याकरिता सहायक पोलीस आयुक्त श्री अजय कुमार मालवीय, श्री अतुल आगरकर, नेहा राऊत आणि राजेंद्र देठे ह्यांनी ऑरेज सिटी वॉटर च्या चालकांना मार्गदर्शन केले.
रास्ता सुरक्षा वाहतूक कार्यालय, धंतोली तर्फे ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथे आयोजित ह्या कार्यक्रमात नागपूर शहरात टँकर चालविताना अपघात होऊ नये ह्यासाठी सुरक्षित वाहन कसे चालवावे ह्यावर प्रात्यक्षिक देखील देण्यात आले.
ऑरेंज सिटी वॉटर च्या तसे दरवर्षी टँकर चालकांना वाहतुकीचे नियम, पाणी टँकर वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच इतर नियम आणि कायदे ह्या संदर्भात मार्गदर्शन करीत असते त्यांच्या डोळे तपासणी आणि इतर तपासणी शिबीर देखील घेत असते, . ह्यावर्षी नागपूर शहर पोलीस वाहतूक विभाग ह्यांनी रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हा कार्यक्रम घेतला आणि मार्गदर्शन केले .
ह्यावेळी ऑरेज सिटी वॉटर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रॉय, निदेशक (मानव संसाधन ) श्री KMP सिंग , श्री प्रवीण शरण, श्री कुलदीप सिंग, श्री प्रकाश महाजन प्रामुख्याने उपस्थित होते .